अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने ताब्यात घेतले असून ईडीने त्याला विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर केले. पीएमएलए न्यायालयाने इक्बाल कासकरला सात दिवसांची म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.
इक्बालचे वकिल सुलतान खान यांनी इक्बाल हा अनेक आजारांनी त्रस्त असून कस्टडीत त्यांना वैद्यकीय औषध आणि घरचे जेवण देण्यात यावे अशी मागणी केली आहे. न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २०१७ मध्ये त्याच्यावर खंडणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर इक्बाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत होता.
हे ही वाचा:
गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी
‘गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी व्हायला हवी’
भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध
चन्नी यांच्या ‘भैय्या’ वादावर मनीष तिवारी ‘हे’ बोलले…
छोटा शकीलचा जवळचा साथीदार सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ईडीने मंगळवारी नऊ तास चौकशी केली. आज त्याला पुन्हा कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी बोलावण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित काही जागांवर ईडीने मंगळवारी सकाळी मुंबईतील विविध दहा च्हापेमारी केली. ईडीने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या घराचीही झडती घेतली.