आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे आणि दिवा स्थानक दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. दुपारी ४.३० वाजता हा सोहळा पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदी हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मार्गिकांचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भागात सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील हे उपस्थित असणार आहेत.
ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग बांधण्यासाठी सुमारे ६२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात १.४ किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल आहेत. तर या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात नव्या उपनगरीय गाड्या सुरु करणे सोयीचे होणार आहे. अशा ३६ नवीन उपनगरीय गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे.
या मार्गिकांच्या कामासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे भूमी अधिग्रहण आणि पुनर्वसनाचे कार्य अतिशय यशस्वीपणे करण्यात आले. त्यामुळे या मार्गिकांच्या कामला वेग आला. मधल्या काळात या मार्गिकांच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान अनेकदा मेगा ब्लॉकही लागू करण्यात आला होता.
हे ही वाचा:
संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले
‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी
किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना
या दोन अतिरिक्त मार्गिकांचे नियोजन हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित येवून पुढे मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. त्यामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी या दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.