मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक राहिलेल्या पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी होणार आहे. प्राथमिक चौकशीनंतर शिंदे दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अमिंताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून सेवा बजावताना त्यांना बच्चन यांच्याकडून वर्षाला अंदाजे दीड कोटी रुपये मिळत होते, असे सांगण्यात येत आहे.
जितेंद्र शिंदे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबलपदावर कार्यरत असताना २०१५ ते २०२१ पर्यंत तो अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होते. शिंदेंना अमिताभ बच्चन यांच्याकडून वार्षिक अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर हल्ली त्यांची साईड ब्रांचला बदली केली गेली होती.
पोलीस सेवेत असताना जितेंद्र शिंदे रितसर अर्ज करून किंवा आपल्या वरिष्ठांना न सांगता चार ते पाच वेळा दुबई आणि सिंगापूरला गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर त्यांनी सुटटीवर जाताना खोटी माहिती दिली होती. चौकशीमध्ये दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पेटीएम, नायका, पीबी आणि झोमॅटो गुंतवणूकदार बुडाले
‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’
धारावी गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले सात जण होते ‘के’ कंपनीचे
शिंदे यांनी आपल्या बायकोच्या नावे एक सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणारी एक एजन्सीही उघडली होती. या कंपनीच्या माध्यमातून बच्चन कुटुंबियांना सुरक्षा रक्षक पुरविले जात असत. पण त्यासाठी मिळणारे पैसे हे बायकोच्या नावे बँक खात्यात जमा न होता, शिंदे यांच्याच खात्या जमा होत असल्याचे दिसले.
शिंदे यांनी काही ठिकाणी मालमत्ता खरेदीही केली होती पण त्यांनी ती उघड केलेली नाही. अमिताभ यांना एक्स प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दोन पाळ्यांमध्ये चार पोलिस सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.