26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणलवकरच येणार हवेत उडणाऱ्या बस...

लवकरच येणार हवेत उडणाऱ्या बस…

Google News Follow

Related

लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळणार आहेत. असे खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका निवडणूक सभेत ही घोषणा केली आहे. इतकंच नाही तर हवाई बसचा डीपीआर तयार करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रयागराजमध्ये विमानासारखी उड्डाण करणारी बस धावेल, त्याचा डीपीआर तयार केला जात आहे, त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.

जाहीर सभेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १८ आसनी विमानाची किंमत १८ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराजमध्ये विमानतळ आहे, आता येथे रिव्हरपोर्टही तयार होणार आहेत. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत चाळीस रिव्हरपोर्ट बांधले आहेत. प्रयागराजमध्ये बांधण्यात येणारा रिंग रोड आणि फाफामाऊ येथील गंगेवर बांधण्यात येणारा सहा पदरी पूल २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. हायड्रोजन इंधनाचा वापरही आता वाढणार आहे. उत्तर प्रदेशात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलचा वापर वाहन इंधनात करण्यात येईल. त्यामुळे पेट्रोलची किंमत ११० रुपयांहून ६८ रुपयांपर्यंत येईल. अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास

चिंचपोकळीची पानसरे इमारत कोसळायला आली तरी आमदार निधीतून विटांचे बांधकाम

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर बंगल्यांबाबत का बोलत नाहीत?

‘यूपी-बिहार वाले भैया’ या चन्नी यांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल..

येत्या काही काळात उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच या सरकारमुळे गुंडाराज संपले असून कायदा-सुव्यवस्था आली असल्याचंही ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी यावेळी विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा