शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मोठे बॉम्ब फोडणार असल्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी आधीच केले होते आणि भारतीय जनता पक्षाच्या साडेतीन नेत्यांची नाव आणि त्यांचे घोटाळे समोर आणू असेही संजय राऊत यांनी सांगितले होते परंतु ना ती साडेतीन नाव समोर आली, ना संजय राऊत यांनी काही बॉम्ब फोडला, त्यामुळे संजय राऊत यांचा आजचा चार वाजताचा ‘प्रेस शो’ फ्लॉप ठरला कि हिट हे आता पुढील काळात बघावं लागेल.