रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला असताना अनेक देशांनी आपल्या नागरिकांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर भारताच्या दूतवासाने देखील भारतीय नागरिकांसाठी एक ऍडव्हायझरी जारी केली आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषतः विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सध्या २० हजारांहून अधिक भारतीय आहेत.
Embassy of India in Kyiv asks Indians, particularly students whose stay is not essential, to leave Ukraine temporarily in view of uncertainties of the current situation pic.twitter.com/U15EoGu89g
— ANI (@ANI) February 15, 2022
भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे की, जर गरज नसेल तर विद्यार्थ्यांना येथे राहण्याची गरज नाही, त्यांनी त्वरित युक्रेन सोडावे. तसेच भारतीयांना युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील राहत असल्यास त्या नागरिकांनी त्वरित दूतवासाला यासंबंधी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरुन आवश्यक असल्यास दूतावास त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.
मॉस्को आणि कीवमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे ऑस्ट्रेलियाने युक्रेनमधील दूतावासही रिकामा केला आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेन यांनी रविवारी घोषणा केली की कीवमधील संपूर्ण कर्मचार्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. पेन म्हणाले की, दूतावासातील काम थांबविण्यात आले होते आणि ते पश्चिम युक्रेनमधील सेव्हच्या तात्पुरत्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. यासोबतच त्यांनी ऑस्ट्रेलियातील नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचा सल्लाही दिला आहे.
हे ही वाचा:
साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाची शक्यता खूप वाढली आहे. अमेरिकेच्या सर्व इशाऱ्यांनंतरही रशियाने आपली आक्रमक वृत्ती सोडलेली नाही. रशिया २४ तासांत आपल्या देशावर हल्ला करू शकतो, अशी भीतीही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, युक्रेनवर रशियन हल्ल्याची पाश्चात्य भीती असूनही ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो सोमवारी संध्याकाळी मॉस्कोला रवाना झाले.