भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ८९ पानांची तक्रार दाखल केली आहे. यावेळी सोमय्या यांच्याबरोबर अॅड. विवेकानंद गुप्ता होते.
संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोरोना पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कोविड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमएस केलेल्या एमडी दाखवण्यात आले. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे कंत्राट घेतलं. विशेष म्हणजे अर्जच आलेला नसतानाही पालिकेच्या अधिकाऱ्याने कंत्राट दिल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. त्यामुळे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांना आता याप्रकरणी सात दिवसात एफआयआर दाखल करावा लागेल. नाही तर आझाद मैदान पोलीस ठाण्याविरोधातच आझाद मैदान कोर्टात तक्रार करू, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड
हे आहेत इस्रोचे अंतराळातील ‘त्रिमूर्ती’
साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली. संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा, असे ते म्हणाले. या घोटाळ्याची कागदपत्रे दिली तरी उद्धव ठाकरे का कारवाई करत नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे. कागदपत्रं खोटी असतील तर मला अटक करा. धमक्या कुणाला देता? माझ्यावर अजून केसेस केल्या तरी आपण थांबणार नसल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.