देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमध्ये आज मतदान पार पडत आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये विभागल्या गेलेल्या ७० विधानसभा मतदारसंघात नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत असून पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तर भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसारखे विरोधी पक्ष पुढे सरसावले आहेत.
उत्तराखंडमध्ये सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. कोविड प्रतीबंधक नियमावलीचे पालन करूनच हे मतदान होणार आहे. राज्यातील ७० विधानसभा मतदारसंघात ६३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य उत्तराखंडच्या ८१ लाख मतदारांच्या हातात आहे. त्यामुळे उत्तराखंड नेमकं कोणाला कौल देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढल्या महिन्यात १० मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
भारतीय जनता पार्टी उत्तराखंडमध्ये २०१७ पासून सत्तेत असून गेल्या वर्षभरात भाजपने दोन वेळा राज्यातील मुख्यमंत्री बदलले आहेत. सुरुवातीला त्रिवेंद्र सिंह रावत हे भाजपाचे मुख्यमंत्री होते. पण नंतर त्यांना बदलून भाजपिने तिरथ सिंग रावत यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. पण नंतर त्यांनाही बदलण्यात आले आणि पुष्कर सिंग धामी हा युवा चेहरा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला.
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम
उत्तराखंड, गोव्यासाठी मतदार देणार कौल! उत्तर प्रदेशमध्येही होणार मतदान
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात ‘पुष्कर फ्लॉवर भी हेअर फायर भी’ असे म्हटले होते. पण मतदारांनाही नेमके तेच वाटते का हे आजच्या मतदानातून स्पष्ट होईल. पुष्कर सिंग धामी हे त्यांच्या खातिमा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
२०१७ साली उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. ७० जागांच्या विधानसभेत भाजपाने ५७ जागी यश मिळवत राज्यात एक हाती सत्ता स्थापन केली होती. अशाच प्रकारचे निवडणुकीतील सादरीकरण पुन्हा एकदा करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.