लाखो भाविनकांचे श्रधास्थान असलेल्या चंद्रभागेचे पाणी पिण्यास आणि आरोग्यास हानिकारक असल्याची धक्कादायक माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर शेवाळ तयार झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. येथील नदीपात्राच्या अस्वच्छतेचे वास्तव सकाळ आणि साम टीव्ही ने नुकतेच समोर आणले होते. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी आणि वापरकर्त्यांनी नदीपात्रात स्वच्छता मोहिम राबवली. त्यानंतरतही चंद्रभागेची दुरावस्था जशीच्या तशीच आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी नदीपात्रातील पाण्याचे नमूने भूजल सर्वेक्षण आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे तपासणीसाठी दिले होते. त्या पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून नदीपात्रातील पाणी पिण्यास हानिकारक असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी नदीपात्रातील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करु नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
हे ही वाचा:
जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा
हिजाब वादानंतर आता कर्नाटकात नमाज वाद?
गोव्यात ४० जागांसाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी लावला जोर
चक्क ‘पुष्पा’ मुळे पकडले गेले चोर….
चंद्रभागा नदीच्या पाण्यात शेवाळ, घाण, अळया, किडे आदि गोष्टी आढळून आल्या आहेत. तसेच हे पाणी मलमूत्रमिश्रित असल्याचेही समोर आले आहे. चंद्रभागा नदीत स्नान करणाऱ्या भाविकांना अंगाची खाज आणि काहींना त्वचेवर फोड येताना दिसत आहेत त्याशिवाय प्रसाद म्हणून ते पाणी पिणाऱ्यांना पोटाचे विकार झाल्याचे समोर येत आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी स्वच्छता केली नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. तसेच नदीच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन भाविकांना केले गेले आहे.