जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यांनी केलेल्या टीकेवरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना पंतप्रधानांचा द्वेष का करतात यातून स्पष्ट होते, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू असे म्हटले. आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इलाज सरकारी दराने करून घ्यावा. त्यांचा इलाज करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावरून अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू” हे मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे. “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा शिवसेना द्वेष का करते तेच यातून स्पष्ट होते.”
"भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू" हे मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे.
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा शिवसेना द्वेष का करते तेच यातून स्पष्ट होते. pic.twitter.com/5kqG194FJE— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 13, 2022
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा
‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’
…. म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने दिली टेबल टेनिस फेडरेशनच्या कामकाजाला स्थगिती
राज्यातील अनेक नेत्यांचे घोटाळे किरीट सोमय्या यांनी समोर आणले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप होत असतात. नुकताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला देखील होता. यावरून राज्यात राजकारण तापले आहे.