32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाएबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

Google News Follow

Related

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या घोटाळयानंतर आता याहून मोठा घोटाळा गुजरातमधून समोर आला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्ड या कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. आत्तापर्यंत उघड झालेल्या घोटाळ्यांपैकी हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे.

एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) विरोधात आणि कंपनीच्या संचालकांविरोधात सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४१ कोटींना फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर लावण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने शनिवारी कंपनीच्या कार्यालयांवर धाडसत्र राबवले. एबीजी शिपयार्ड कंपनीसोबतच कंपनीचे संचालक रिशी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एबीजी शिपयार्डशी संबंधित मुंबईतील काही ठिकाणी देखील सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. यासंदर्भात सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून निधी बँकेने दिलेल्या कारणाव्यतिरिक्त दुसरीकडे वळवणे, बेकायदेशीर कृत्य अशा गोष्टी केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

Tata IPL 2022 Mega Auction: लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काय होणार?

Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी

हमारा बजाज

एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचे २ हजार ९२५ कोटी, आयसीआयसीआय बँकेचे ७ हजार ०८९ कोटी, आयडीबीआयचे ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाचे १ हजार ६१४ कोटी, पीएनबीचे १ हजार २४४ कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे १ हजार २२८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

काय आहे एबीजी शिपयार्ड?

एबीजी शिपयार्ड कंपनीचे मुख्यालय केंद्र गुजरातच्या दहेज आणि सुरतमध्ये असून ही कंपनी मोठी जहाजं बनवणे आणि ती दुरुस्त करण्याच्या व्यवसायात आहे. या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज (DWT) क्षमतेची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेजची जहाजं बांधण्याची क्षमता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा