जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या Tata IPL 2022 साठीचा लिलाव सध्या बंगलोर येथे सुरू आहे. शनिवार १२ फेब्रुवारी आणि रविवार १३ फेब्रुवारी असे दोन दिवस हा लिलाव चालणार आहे. त्यापैकी लिलावाचा पहिला दिवस काल पूर्ण झाला असून आज म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लिलावाचा दुसरा दिवस सुरु होणार आहे.
या मेगा लिलावाचा पहिला दिवस ऐतिहासिक ठरला. स्पर्धेतील दहा संघ लिलावात उतरलेल्या खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करून घेण्यासाठी कोटीच्या कोटी बोली लावताना दिसले. ज्यामध्ये अनेक भारतीय युवा खेळाडूंना लॉटरी लागलेली दिसली. तर काही ज्येष्ठ खेळाडूंसाठी कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे लिलावाच्या दुसऱ्या दिवशी नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हे ही वाचा:
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का
बायडन-पुतीन यांच्यात फोनवरून होणार ‘युक्रेन पे चर्चा’
आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले
हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!
लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स या संघाने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपये मोजत ईशानला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. यापूर्वीही ईशान मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग होता. ईशान किशन या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू ठरेल असे मत माजी फिरकीपटू हरभजन सिंगसह अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. जे खरे ठरलेले दिसत आहे.
तर दीपक चहर हा दोन नंबरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्स संघाने चौदा कोटी रुपयात खरेदी केले. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरसाठी १२ कोटी २५ लाखांची बोली लावली. अय्यर हा कोलकाता संघाचा कर्णधार ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
याव्यतिरिक्त एकूण सात खेळाडू दहा करोड क्लबचा भाग झालेले पाहिला मिळाले. थोडक्यात त्यांना दहा करून किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आले. यामध्ये तीन भारतीय तर तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन निकोलस पूरन, आवेश खान, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, वनींदू हसरंगा या खेळाडूंचा समावेश आहे.
पण याच वेळी अनेक वरिष्ठ खेळाडूंना कोणतीही बोली लागताना दिसली नाही. एकेकाळी मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेला अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याला विकत घेण्यासाठी कोणताच संघ उत्सुक दिसला नाही. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा शाकिब अल हसन हे खेळाडूही अनसोल्ड गेले.
लिलावाच्या पहिल्या दिवशी हैदराबाद संघाने सर्वाधिक म्हणजे दहा खेळाडूंची खरेदी केली आहे. तर मुंबई संघाने सर्वात कमी म्हणजेच चार खेळाडूंची खरेदी केली आहे. तर पहिल्या दिवसा अखेर सर्वाधिक रक्कम पंजाब संघाकडे शिल्लक असून त्यांच्याकडे २८ कोटी ६५ लाख रुपये बाकी आहेत. तर लखनऊ संघाकडे सर्वात कमी म्हणजेच ६ कोटी ९० लाख रुपये बाकी आहेत.
रविवार १३ फेब्रुवारी रोजी लिलावाचा दुसरा दिवस पार पडणार असून दुपारी बारा वाजता लिलावाला सुरुवात होईल. यावेळी मुंबई इंडियन्स हा संघ संपूर्ण ताकदीनिशी लिलावात उतरताना दिसेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.