मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात एक कोटी रुपये खर्च करून उंदीर मारण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे, मात्र त्याचा तपशील दिला नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
उंदीर मारण्याबाबतचा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ‘ए’ ते ‘टी’ विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात एक कोटी रुपये खर्च करून उंदीर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.
एक उंदीर मारण्यासाठी २० रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदीर मारल्यास प्रत्येक उंदीर मारण्यास २२ रुपये या दराने उंदीर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे, अशी माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली. पालिकेने केवळ पाच वॉर्डमध्ये एक कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदीर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, असे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
किरीट सोमय्यांचा भाजपकडून पुण्यातल्या त्याच पायऱ्यांवर सत्कार
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
उंदरांच्या उत्पतीची कोणतीही कारणे हे प्रस्तावात स्पष्ट केलेले नाही. यामुळे नक्की उंदिर मारले गेले आहेत का? असा प्रश्न प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच पुढील बैठकीत माहिती येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवला आहे.