32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामालखीमपूर हिंसाचार: गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला जामीन

लखीमपूर हिंसाचार: गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला जामीन

Google News Follow

Related

लखीमपूर खेरी हिंसाचारातील आरोपी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला लखनौ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला आहे. लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आशिष मिश्रावर शेतकऱ्यांना कारने चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी यापूर्वीच पूर्ण झाली होती. न्यायालयाने आता आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे.

उत्तर प्रदेशच्या एसआयटीने कोर्टात हिंसाचाराविरुद्ध पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये आशिष मिश्राचे नाव मुख्य आरोपी म्हणून होते. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, घटनेच्या वेळी आशिष मिश्रा घटनास्थळी उपस्थित होता आणि त्याने रिव्हॉल्व्हरने गोळीबारही केला होता. आशिषने याला नकार दिला असला तरी तपासाअंती पोलिसांना अशी माहिती मिळाली की, आशिष मिश्रा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाला होता.

 

लखीमपूर हिंसाचार प्रकरण काय होते?

३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

हिजाब वादावरून दोन नेत्यांची भिन्न मते…बिघडले महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार?

बूट पॉलिश करणारे रेल्वेविरोधात आक्रमक…. CSMT स्थानकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी सुधारित नियमावली

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा