32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषबीडच्या शेतकऱ्याने बांधली दीड कोटींची विहीर...

बीडच्या शेतकऱ्याने बांधली दीड कोटींची विहीर…

Google News Follow

Related

बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्याने तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून एक विहीर बांधली आहे. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा रंगली आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत बजगुडे यांची बारा एकर शेती आहे.दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी ठरल्याप्रमाणे या पाणीटंचाईच्या समस्येला बजगुडे त्रस्त झाले होते. म्हणून त्यांनी त्यांच्या शेतात एक एकरमध्ये विहीर करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वीरीत्या विहीरीचे काम पूर्ण केले. ही विहीर ४१ फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद आहे. या विहिरीमध्ये सध्या त्यांनी दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा करून ठेवला आहे.

बजगुडे यांचा मूळ व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा आहे. ही विहीर पूर्ण बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला आहे. विहीर खणताना निघालेले जे साहित्य होते त्याची विक्री करून १० ते १२ लाख रुपये मिळाले तेही विहीर बांधणीसाठी कामी आले. आता या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बागायती शेती करायला सुरुवात केली आहे. या विहिरीच्या पाण्यावर कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये टरबूज पेरू आणि मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र

अशक्य केले शक्य!…पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री योगींचे भरभरून कौतुक

बजगुडे यांनी बांधलेली ही एवढी मोठी विहीर आता इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे. त्यामुळे बीड मधूनच नाही तर शेजारच्या जिल्ह्यातून देखील अनेक शेतकरी ही विहीर पाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गर्दी करत आहेत. बजगुडे यांनी बांधलेली ही विहीर कदाचित राज्यातील सर्वात मोठी विहीर असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा