32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषदोन दिवस खडकात अडकलेल्या ट्रेकरला वाचवायला आले लष्करातले देवदूत

दोन दिवस खडकात अडकलेल्या ट्रेकरला वाचवायला आले लष्करातले देवदूत

Google News Follow

Related

सध्या ट्रेकिंगला जाण्याचे आकर्षण वाढू लागले आहे. पण कधी-कधी उत्साहाच्याभरात हे ट्रेकिंगचं वेड अंगाशी येते. असाच अनुभव केरळच्या एका तरुणाला आला आहे. अक्षरशः तो तरुण मृत्यूच्या दारातून परत आला आहे. हा तरुण दोन दिवसांपासून विना अन्न-पाण्याचा डोंगराच्या कडप्यात अडकला होता.

दरम्यान त्याला डोंगराच्या कडप्यातून भारतीय लष्कराने सुखरुप बाहेर काढले आहे. त्यानंतर त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आले. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईनंतर दोन टेकड्यांमध्ये अडकलेल्या या तरुणाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात आर बाबू (२३) हा त्याच्या मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो दोन टेकड्यांच्या मध्ये अडकला. त्यानंतर बाबूने आपण अडकल्याची माहिती ओरडून खाली वाट पाहत असलेल्या मित्रांना दिली. त्याच्या साथीदारांनी प्रथम त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश न आल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हस्तक्षेप करत तरुणाला वाचवण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतली. यानंतर बंगळुरूहून हवाई दल आणि लष्कर मदतीसाठी पोहोचले.

हे ही वाचा:

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

पुण्यातील हल्ल्याप्रकरणी सोमय्या पोहोचले दिल्लीत

मग लष्कराच्या मदतीने त्याला वाचवण्याच्या प्रयत्न सुरु झाला. सोमवारी रात्रीपर्यंत यश न मिळाल्याने मंगळवारी पुन्हा प्रयत्न करण्यात आले आणि बाबुला सुखरूप सोडवण्यात लष्कराला तब्बल ४८ तासांनी यश आले.

दोन दिवस आर बाबू अन्न-पाण्याविना एका छोटयाश्या कपाऱ्यात अडकला होता. स्थानिक आमदार ए. प्रभाकरन यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा मंत्री कृष्णनकुट्टी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, केरळच्या पलक्कड जिल्ह्यात ट्रेकिंगला गेलेला बाबू टेकडीत अडकल्याची घटना आयुष्यभर विसरता येणार नाही. बाबूच्या कुटुंबीयांनी आणि त्याने लष्कराचे व हवाई दलाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा