एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकते असं म्हणत कोणे एकेकाळी शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मलाला युसूफझाईला आता हिजाब अधिक महत्त्वाचा वाटू लागला आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. याला कारण ठरले आहे मलालाचे एक ट्विट.
सध्या कर्नाटकमधील हिजाब प्रकरण भारतात चांगलेच गाजत आहे. कर्नाटक मधील एका शाळेने हिजाब हा गणवेशाचा भाग नसून तो घालण्यास मज्जाव केल्यामुळे हे प्रकरण सुरू झाले आणि बघता बघता या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळी आंदोलने पाहायला मिळाली.
काही ठिकाणी ही आंदोलने खूपच तीव्र झाली असून या पार्श्वभूमीवर कर्नाटक मधील शाळा आणि महाविद्यालये सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. तर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे का यावर न्यायालयात निर्णय होणे अपेक्षित आहे. पण या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद इतरत्रही उमटताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल निवडणूक हिंसाचार प्रकरणी तिघांना अटक
संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते
ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
महाराष्ट्रातही हिजाबच्या समर्थनार्थ बॅनरबाजी आणि आंदोलने होताना दिसत आहेत. जिथे ‘पहिले हिजाब, फिर किताब’ असे बॅनर बीडमध्ये पाहायला मिळाले तर आज सोलापूरमध्येही या संबंधात आंदोलन होताना दिसले.
याच प्रकरणाच्या अनुषंगाने पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफझाई हिने हिजाबच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुय्यम वागणूक देणे थांबवले पाहिजे अशा प्रकारचे विधान तिने केले आहे. तर हिजाब घातल्यावर मुलींना शाळेत येण्यास मज्जाव करणे भयावह असल्याचेही तिने म्हटले आहे. पण हिजाब शाळेच्या अथवा महाविद्यालयाच्या गणवेषाचा भाग नसेल तर हिजाब घालण्याचा हट्ट का करावा? असा सवाल मलालाला पडला नाही. मलाला ही स्वतःचा वापरत असल्याने तिला देखील शिक्षणापेक्षा हिजाब अधिक महत्त्वाचा वाटतो का? असा सवाल या निमित्ताने पुढे येताना दिसत आहेत.
मलालाने या आधीही शेतकरी आंदोलनाच्या वेळेला भारत विरोधी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता भारतातील अंतर्गत बाबीत बोलताना धार्मिक ओळखीला ती अधिक प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“College is forcing us to choose between studies and the hijab”.
Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I
— Malala (@Malala) February 8, 2022