24 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरधर्म संस्कृती'हिजाब' वादाचे कर्नाटकबाहेर पडसाद....भाजप - काँग्रेस आमनेसामने !

‘हिजाब’ वादाचे कर्नाटकबाहेर पडसाद….भाजप – काँग्रेस आमनेसामने !

Google News Follow

Related

कर्नाटकात सुरु असेलल्या हिजाब वादाचे पडसाद इतर राज्यांतही उमटले आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरीमध्ये दिसून येत आहेत. हिजाबच्या वादावरून कर्नाटकात राजकारण तापले आहे. आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. या वादावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.

काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी हिजाबचे समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या, महिला काहीही परिधान करू शकतात, तसा संविधानात अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर भाजपनेही आपले मत व्यक्त केले आहे. हे हिजाबाचे प्रकरण भडकवण्यात आले असून, त्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप कर्नाटकच्या मंत्र्याने केला आहे. या प्रकरणावर आजही कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबईत मुस्लिम समाजवादी पार्टी विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवत असून आंदोलने केली जात आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, जिथे कुठेही अशी घटना घडली असेल तिथे कारवाई केली जाईल. अशा घटनांबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही ज्या लोकांना अटक केली आहे ते विद्यार्थी नसून, बाहेरचे लोक आहेत. सरकारला आज न्यायालयाच्या आदेशाची अपेक्षा आहे. तसेच सरकार न्यायालयाला सल्ला देऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर जो न्यायालयाचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. तत्पूर्वी, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि त्यांना हिजाब आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या घटनांनंतर झालेल्या अटकेबद्दल माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

पुद्दुचेरीत उमटले हिजाबवादाचे पडसाद

सोमवारी पुद्दुचेरीतील एका सरकारी शाळेबाहेर अनेक कार्यकर्ते जमले कारण मुस्लिम मुलीला वर्गात हिजाब घालण्याची परवानगी न दिल्याने त्यांनी निषेध केला. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी अरियानकुप्पम येथील शाळेत जाऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, पुद्दुचेरी सरकारच्या शालेय शिक्षण संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यास अरियानकुप्पम सरकारी शाळा प्रमुखांना सांगितले आहे. विद्यार्थिनींना शिक्षणाऐवजी हिजाब निवडण्यास सांगितले जात असल्याचे भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटले आहे.

‘या वादामागे काँग्रेसचा हात’

भाजप कर्नाटकने ट्विट केले की, “ हिजाब वादात काँग्रेसचा हात आहे. हायकोर्टात हिजाबच्या बाजूने युक्तिवाद करणारा वकील काँग्रेसच्या कायदेशीर सेलचा प्रतिनिधी आहे. काँग्रेस अशा प्रकारचे काम करत आहे हे सांगण्यासाठी दुसरे उदाहरण हवे का? तुम्ही समाज तोडत आहात का?” असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

कर्नाटकातील हिजाबच्या वादात मंगळवारी बागलकोटमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि शिवमोग्गामध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा