शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना लिहिलेले पत्र हा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून सध्या राज्याचे राजकारण तापताना दिसत असून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लिहिलेले पत्र पाहून त्यांची कीव करावीशी वाटते असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
राज्यात सत्ता आहे म्हणून विरोधकांना मारहाण करून त्याचे निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटलाय. ईडीची कारवाई जेलचा रस्ता दाखवणार या भीतीने ते गारठलेत. पापं मान्य करण्याचे धाडस नसल्यामुळे आकांडतांडव करतायत. काळा पैसा वाईट दिवस दाखवतोच असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सभापतींना लिहिलेले पत्र वाचून त्यांची कीव करावीशी वाटते असं मत भाजपाचे नेते आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहे. कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आणि इतर भाजपा नेत्यांविषयी अर्वाच्च भाषेत बोलणारे संजय राऊत आता ईडीला का घाबरत आहेत? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. कर नाही त्याला डर कशाला? असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
आता संजय राऊत यांना लोकशाही आठवायला लागली आहे. पण राऊत यांनी काळजी करू नये, ईडी त्यांच्यावर जी कारवाई करेल ती लोकशाही मार्गानेच करेल असे भातखळकर यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारने एका महिलेला बोगस डिग्रीच्या नावाखाली ४७ दिवस तुरुंगात डांबले. किरीट सोमैय्यांवर हल्ला झाल्यावर त्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करण्यात आली आणि आता तुम्हाला लोकशाही आठवत आहे का? कायदा आपले काम करेल आणि जर कर नसेल तर घाबरायचं काहीही कारण नाही. कायद्याला सामोरे जा असे भातखळकर यांनी म्हटले आहे
तसेच संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे महाभकास आघाडी सरकार पडेल या भ्रमात त्यांनी राहू नये. तो भाजपाचा कधीही नव्हता, नाहीये आणि नसेल असेही भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात सत्ता आहे म्हणून विरोधकांना मारहाण करून त्याचे निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटलाय. ED ची कारवाई जेलचा रस्ता दाखवणार या भीतीने ते गारठलेत. पापं मान्य करण्याचे धाडस नसल्यामुळे आकांडतांडव करतायत. काळा पैसा वाईट दिवस दाखवतोच. pic.twitter.com/1R01iVDp6y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 9, 2022