पंजाब काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चरणजित सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी चरणजित सिंग चन्नी यांना गरिबांचा मुलगा म्हटले. तसेच ते गरिबीतून बाहेर आले असून गरिबांच्या वेदना समजून घेणार असल्याचे सांगितले. मात्र, चरणजीत सिंह चन्नी हे खरंच गरीब आहेत का आणि ते किती गरीब आहेत हे सर्वसामान्यांना कळणे अत्यंत आवश्यक आहे.
चरणजीत सिंह चन्नी विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चमकौर साहिब आणि भदौर मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. चन्नी हे चमकौर साहिब मतदारसंघातून तीन वेळा आमदार बनले आहेत. मात्र, राहुल गांधींच्या घोषणेनंतर आता सामान्य लोक विचारत आहेत की, ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, ते चन्नी गरीब असे असू शकतात.
निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चरणजीत सिंह चन्नी यांनी त्यांच्याकडे ९.४५ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. शपथपत्रानुसार, २०१७ मध्ये चरणजीत सिंह चन्नी यांची संपत्ती १४.५१ कोटी इतकी असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार २०२२ मध्ये चरणजीत सिंह चन्नी यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली, पण ते ‘गरीब’ आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव
देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!
महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन
प्रतिज्ञापत्रानुसार, चरणजित सिंह चन्नी यांच्याकडे २.६२ कोटींची मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता ६.८२ कोटींहून अधिक आहे. त्याचबरोबर चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे १.५० लाख आणि त्यांची पत्नी कमलजीत कौर यांच्याकडे ५० हजारांची रोकड आहे. तर चन्नी यांच्या बँक खात्यात ७८.४९ लाख आणि पत्नीच्या बँक खात्यात १२.७६ लाख रुपये आहेत. त्यांच्याकडे ३२.५७ लाख किंमतीची टोयोटा फॉर्च्युनर कारही आहे. त्यांच्या पत्नीकडे दोन गाड्या आहेत. त्यातील एका गाडीची किंमत १५.७८ लाख आहे तर दुसऱ्या गाडीची किंमत ३०.२१ आहे.