31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषअरुणाचलमध्ये हिमस्खलनात लष्कराचे सात जवान अडकले 

अरुणाचलमध्ये हिमस्खलनात लष्कराचे सात जवान अडकले 

Google News Follow

Related

अरुणाचल प्रदेश येथे भारतीय लष्कराचे जवान अडकल्याचे वृत्त आहे. अरुणाचल येथील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनामुळे सात भारतीय लष्कराचे जवान अडकले आहेत. अडकलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून या भागात हवामान खराब आहे. तसेच जोरदार बर्फवृष्टी होत आहे.

लष्कराचे जवान या परिसरात गस्त घालत होते. रविवारी झालेल्या हिमस्खलनात ते अडकले. त्यानंतर मदत कार्यासाठी तज्ज्ञांचे पथक विमानाने पाठवण्यात आले आहे. उंचीच्या भागात तैनात असलेल्या जवानांना उंच जागी कसे राहायचे, थंडीत कशी काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, तरीही हिवाळ्याच्या महिन्यांत उंचावरील भागात गस्त घालणे कठीण होते.

हे ही वाचा:

अभिनेत्री माही गिलचा भाजपामध्ये प्रवेश

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

यापूर्वीही अशा काही घटनांमध्ये लष्कराने जवान गमावले आहेत. मे २०२० मध्ये सिक्कीममध्ये झालेल्या हिमस्खलनात दोन जवानांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या हिमस्खलनात पाच नौदलाचे जवान मरण पावले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये सरकारने संसदेत सांगितले की, २०१९ मध्ये सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनात सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता, तर इतरत्र अशाच घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा