अमेरिकन रिसर्च फर्म मॉर्निंग कन्सल्ट द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन तसेच यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांसारख्या जागतिक नेत्यांना मागे टाकत ७२ टक्क्याच्या सर्वोच्च रेटिंगसह ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल’ रेटिंग यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
या यादीनुसार, तेरा जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर असून, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर ६४ टक्के, इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी ५७ टक्के, फुमियो किशिदा ४७ टक्के, तर जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ ४२व्या स्थानावर आहेत.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/wRhUGstJrS
Modi: 72%
López Obrador: 64%
Draghi: 57%
Kishida: 47%
Scholz: 42%
Biden: 41%
Moon: 41%
Morrison: 41%
Trudeau: 41%
Sánchez: 37%
Bolsonaro: 36%
Macron: 35%
Johnson: 30%*Updated 02/03/22 pic.twitter.com/h51SXXBAFj
— Morning Consult (@MorningConsult) February 6, 2022
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो या सर्वांनी ४१ टक्के रेटिंग मिळवली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ ३७ टक्के, ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ३५ टक्के मिळवले आहेत.
हे ही वाचा:
राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
बुटात लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज
स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी
फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय
बोरिस जॉन्सन यांना यादीत सर्वात कमी गुण मिळाले आहेत, कारण ब्रिटनचे पंतप्रधान त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जगावर महामारीच्या संकटावेळी त्यांनी आणि कर्मचार्यांनी कठोर कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान पार्ट्या केल्या होत्या.
हे सलग तिसरे वर्ष आहे की, पंतप्रधान मोदी इतर सर्व जागतिक नेत्यांमध्ये इतक्या मोठ्या फरकाने शीर्षस्थानी आहेत. ही रिसर्च फर्म सर्व तेरा देशांसाठी नवीनतम डेटा प्रदान करते, जगभरातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे चित्र या कंपनीच्या माध्यमातून उभे केले जाते.