देशातील आघाडीचे मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या जिओ (Jio) चे नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज ५ फेब्रुवारी रोजी दुपारपासून जिओचे नेटवर्क डाऊन व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर ट्विटरसह सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याने मीम्सचा पुर आला आहे. काही तांत्रिक बाबींमुळे हा बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मात्र, कंपनीकडून हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकर जिओची मुंबई आणि उपनगरातील सेवा पूर्वपदावर येईल, असा अंदाज आहे.
हे ही वाचा:
पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक
सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक
दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी
शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाइल नेटवर्क टॉवरविषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नकार दिला आहे. करार संपल्याने पुलावरील टॉवर हटवून संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे कॉल ड्रॉप, कॉल न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, मोबाइल नेटवर्क नसणे, इंटरनेट वेग कमी होणे असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.
शहरातील एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असलेल्या उड्डाणपुलांवर मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क टॉवर आहेत. या टॉवरसाठी एमएसआरडीसी आणि मोबाइल नेटवर्क कंपनीमध्ये करार होतात. काही करार हे ‘थर्ड पार्टी’कडून करण्यात येतात. यानुसार सुयोग टेलीमॅटिक्सने पैसे थकवल्याने ही कारवाई सुरू असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे. थर्ड पार्टीकडून पैसे मिळत नसल्याचे सांगत यापूर्वीही २५० टॉवर बंद करण्याची कारवाई एमएसआरडीसीने केली होती.