दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मास्क अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्यही झाला आहे. घराबाहेर पडल्यावर ते लावणे आवश्यक आहे, परंतु जास्त वेळा लावल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय बाहेर जेवतानाही मास्क काढावा लागतो. या समस्येवर उपाय दक्षिण कोरियातील एका कंपनीने शोधून काढला आहे. त्यांनी असा मास्क तयार केला आहे, जो त्याच्या डिझाइनमुळे जगभरात चर्चेत आला आहे.
हा अनोखा मास्क दक्षिण कोरियाच्या एटमन कंपनीने बनवला आहे. ‘कोस्क’ असे या मास्कचे नाव असून, हा संपूर्ण मास्क असला तरी त्याची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, तुम्हाला हवे असल्यास तो पूर्णपणे परिधान करता येतो किंवा तो दुमडून नाकापर्यंत मर्यादित ठेवता येतो. ज्यांना मास्क लावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे.
हे ही वाचा:
‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस पुरस्कार
सर्वोच्च न्यायालय म्हणते, मनी लॉन्ड्रिंगचा वापर दहशतीसाठीही केला जातो!
कोस्क असे नाव का दिले
या मास्कला ‘कोस्क’ असे नाव देण्यात आले आहे कारण ‘कोस्क’ हा कोरियामध्ये नाकासाठी वापरला जाणारा ‘को’ आणि मास्क या शब्दाचा संयोग आहे. या मास्कला केएफ८० टॅग देण्यात आला आहे. यामध्ये के हे अक्षर कोरियन आणि एफ हे अक्षर फिल्टर या शब्दासाठी वापरण्यात आले आहे. हा मास्क ०.३ मायक्रॉन कण ८० टक्के कार्यक्षमतेने फिल्टर करू शकते असा दावा या कंपनीने केला आहे.
या दरम्यान, ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे गेल्या २४ तासात प्रथमच २२ हजार ९०७ रुग्णांची दक्षिण कोरियामध्ये नोंद झाली आहे.