PMC तथा पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेचे तत्कालीन माजी संचालक दलजीत सिंग यांना बिहार नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आले आहे. दलजीत सिंग यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३० जानेवारी २०१९ रोजी एलओसी जारी करण्यात आली. बुधवारी रक्सौल, पूर्व चंपारण येथे इमिग्रेशन अधिकारी यांनी दलजीत सिंग यांना ताब्यात घेतले असून मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी दलजीत सिंग यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेले असून मुंबईत आणण्यात आल्यानंतर दलजीत सिंग यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. सिंग यांच्यावर पंजाब बँक घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप आहे. सिंग हे संचालक पदावर असतांना त्यांना या सर्व प्रकरणाची कल्पना असून देखील त्यांनी विरोध केला नाही अथवा याची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती, असा आरोप सिंग यांच्यावर आहे.
नेपाळमध्ये शिरण्याआधी २०० मीटरवरच दलजितसिंह यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दलजीतसिंग बल हा पीएमसी बँकेचा संचालक आहे. ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्यात तो मुख्य आरोपी आहे. घोटाळ्यातील त्याचा हात लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा दलजीतच्या मागावर होती. त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर देश सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तो कचाट्यात सापडला आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे
मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!
विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्याप्रमाणेच देश सोडून पळण्याच्या बेतात असलेल्या दलजितला पोलिसांनी सापळ्यात पकडले. २०१९मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी होती.