राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी परवानगी दिल्यावर विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले असून त्या राज्य सरकार आता हा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णयावरून यु-टर्न घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडले आहे.
“राज्य सरकारची अब्रू चालली आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा लागला. शरद पवार यांना कुठेतरी वाटले असावे की वाईन संदर्भातील निर्णय हा चुकीचा आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे राज्य सरकारला सल्ला दिला आहे की सुधरा,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही हा भाजपचा संकल्प आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द
मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा
क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?
राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. हा फार चिंताजनक विषय नसून काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टीकोन स्वीकारला तर त्यात फारसं वावगं ठरणार नाही, असेही ते म्हणाले.