केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर आर्थिक क्षेत्रातील तज्ञ कौतुक करताना दिसत आहेत. शेअर बाजारावरही या अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. अर्थसंकल्प जाहीर केल्यावर शेअर बाजारात उसळी आलेली पाहायला मिळत आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही ठिकाणी अर्थसंकल्पानंतर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर सेन्सेक्स हा ९०७.९१ पॉइंट्सने वर गेला आहे. या वाढीनंतर सेन्सेक्सने ५८,९२२.०८ वर उसळी घेतली आहे. तर निफ्टीमध्येही २४७.२५ पॉइंट्सची वाढ झालेली पाहायला मिळाली. या वाढीनंतर निफ्टीने १७,५८७.१० वर झेप घेतली आहे.
हे ही वाचा:
Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा
Budget 2022: अर्थमंत्र्यांनी करांसंबंधित काय केल्या घोषणा…
Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?
Budget 2022 : अर्थव्यवस्थेला मिळणार नवी ‘गती शक्ती’
शेअर बाजार वर चढल्याने मोदी सरकारचे हे नवे बजेट गुंतवणूकदारांनी सकारात्मकपणे घेतल्याचे म्हटले जात आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेल्या असतानाच लोकानुनय करणारा अर्थसंकल्प सादर न करता दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प सरकारने जाहीर केल्याचे मत तज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.