भारतीय क्रिकेट संघ आगामी वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत ऐतिहासिक सामना खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा हजारावा एक दिवसीय सामना असणार आहे. हा अनोखा विक्रम नोंदवणारा भारत क्रिकेट जगतातील पहिला देश ठरणार आहे.
या सामन्याच्या निमित्ताने कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही एका अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे. हजाराव्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान रोहितला मिळणार आहे.
रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिलीच मालिका असणार आहे. यावेळी साऊथ आफ्रिका विरुद्ध ३-० अशी मालिका गमावल्यानंतर आपला फॉर्म परत आणण्यासाठी आणि विजयी घोडदौड सुरू करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
हे ही वाचा:
मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय
सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात
कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?
६ फेब्रुवारीपासून वेस्टइंडीज चा भारत दौरा सुरू होणार असून या मालिकेतील पहिला सामना हा भारतीय क्रिकेट संघाचा हजारावा एकदिवसीय सामना असणार आहे १९७४ ला इंग्लंड विरोधात भारताने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला असून त्यावेळी अजित वाडेकर यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तर पाचशेव्या सामन्यात सौरव गांगुली हा भारताचा कर्णधार होता.
या आधी सातशे, आठशे आणि नऊशेव्या एकदिवसीय सामन्यासाठी महेंद्र सिंग धोनीने कर्णधार म्हणून धुरा सांभाळली होती. तर आता एक हजाराव्या सामन्यात रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेट मैदानात हा सामना खेळला जाणार आहे.