अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करीत असताना एका हिंदू संघटनेच्या तीन कामगारांवर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सांगितले की ते श्रीरामचे पोस्टर्स घेऊन त्यांच्या वाहनातून निधी संकलन मोहिमेवर गेले होते. दरम्यान पेट्रोलपंपावर थांबले असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या कार्यकर्त्यांमधील एकाने सांगितले की त्यांना रस्त्यावर चार ते पाच स्थानिक लोकांनी थांबवले आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. लवकरच त्याचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेक सुरु झाली. इतर स्थानिक रहिवाशांनी हस्तक्षेप केल्यावर परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली गेली.
“आम्ही जवळपास पंधरा दिवसांपासून निधी संकलन मोहीम राबवित आहोत. या घटनेत आमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत, आम्ही पोलिसांकडे याविषयी तक्रार दाखल केली आहे,” असे भाजपाचे बंगलोर दक्षिण युनिटचे सरचिटणीस व्ही. सुदर्शन म्हणाले.
शुक्रवारी दुपारी १२:२० च्या सुमारास ही घटना घडली. कार्यकर्त्यांना धमकावल्याबद्दल पोलिसांनी ४०-५० अज्ञात व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरमध्ये धमकी देणे, धार्मिक कलह वाढवणे, बेकायदेशीर जमाव आणि त्यांच्या विरोधात होणार्या इतर गुन्ह्यांची नोंद आहे.
“आम्ही पोलिसांना सांगितले आहे की जर त्यांनी 24 तासांत दोषींना अटक केली नाही तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करू. आमचे स्वतःचे सरकार सत्तेत असल्याने आम्हाला खात्री आहे की दोषींना अटक होईल.” सुदर्शन म्हणाला.