किरीट सोमय्यांचा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाइन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी आजच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत केला आहे.
संजय राऊत यांच्या परिवाराने १६ एप्रिल २०२१ मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली होती. त्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली. या कंपनीचे नाव पूर्वी ‘ मादक प्रायव्हेट लिमिटेड ‘ होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून ‘मॅक पी ‘, असे ठेवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुढे ती हेही म्हणाले की, अशोक गर्ग हे २०१० पासून दोन कंपन्या चालवतात. यापैकी एक कंपनी वाइन वितरणाचा व्यवसाय करते. मुंबई आणि पुणे परिसरातील हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये अशोक गर्ग यांच्या कंपनीकडून वाइन पुरवली जाते. अशोक गर्ग यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण शंभर कोटी इतकी आहे.
हे ही वाचा:
मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय
सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात
कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?
एप्रिल २०२१ मध्ये संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली आहे. त्यांच्या मुली विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. संजय राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. येत्या काही दिवसांमध्ये मी लवकरच संजय राऊत यांच्या आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करेन, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांची वाइन उद्योगात गुंतवणूक असल्यामुळे ते आता राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. वाइन म्हणजे दारु नव्हे, असा युक्तिवाद ते करत आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.