32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाशिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप

शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप

Google News Follow

Related

विरारमध्ये शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेने चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जितू खाडे असे या शिवसेना विभाग प्रमुखाचे नाव असून तो फोन कॉलवरून शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याच कारणाने संतप्त महिलेने जितू याला भररस्त्यात रिक्षातच चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून आयटम चाहीये? असे म्हणत या महिलेने जितू खाडे याला रिक्षातच चपलेने मारायला सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. फोन कॉल करुन शरीरसुखासाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

हे ही वाचा:

‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’

नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संशयित आरोपी जितू खाडे हा सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी या कृतीचा निषेध केला आहे. तसेच जितू खाडे च्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असे त्यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा