21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाप्रजासत्ताक दिनी दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

Google News Follow

Related

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीत महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिच्यावर प्राणघातक हल्ला या नराधमांनी केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार परिसरात ही घटना घडली आहे. पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, बलात्कार केल्यांनतर त्या महिलेचे केस कापले आणि चपलांचा हार घालून तिला रस्त्यावर फिरायला लावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून, तिला एक मूल आहे. मध्यंतरी अनेक महिने तिच्या शेजारी राहणारा एक तरुण तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येसाठी या महिलेला जबाबदार धरले आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये राजकीय उलथापालथ…

‘महापौर, वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थ करत आहात का?’

भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये कोण ठरणार सरस?

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

दरम्यान, या घटनेची माहिती महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे. पीडितेला सर्व शक्य मदत आणि समुपदेशन केले जात आहे.

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिला आयोग दिल्ली पोलिसांना याप्रकरणी नोटीस देखील जारी करणार आहे. ” अवैध दारू विक्रेत्यांनी महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.” असे महिला आयोगाने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा