22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषप्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

Google News Follow

Related

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्याचा टप्पा मी पार केला आहे, असे स्पष्टीकरण देत पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी पुरस्कार नाकारला आहे.

जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले, “मला मंगळवारी (२५ जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्वीकारण्याबाबत फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटले. करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्विकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”

१० वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला असता तर आनंदाने स्विकारला असता. माझ्यासोबतचे आणि अगदी माझ्या कनिष्ठांना देखील खूप वर्षांपूर्वीच हा पुरस्कार मिळाला आहे, असे पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले. त्यामुळे त्यांनी माफी मागत नम्रपणे हा पुरस्कार स्विकारू शकत नाही असे कळवल्याचे पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले.

पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडित रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे. पंडित अनिंदो चॅटर्जी यांना २००२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी याआधीच राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केले होते. १९८९ मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते.

हे ही वाचा:

आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा

‘ राफेल ‘ची पहिली महिला पायलट शिवांगी…

श्रीनगरच्या लालचौकातील घंटाघरावर प्रथमच फडकला भारतीय तिरंगा

प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांनी देखील पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. जवळपास आठ दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यानंतर वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना यापेक्षा मोठा सन्मान मिळायला हवा, असे संध्या मुखर्जी यांची मुलगी म्हणाली.

दरम्यान, पश्चिम बंगालमधून एकूण तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पंडित अनिंदो चॅटर्जी आणि संध्या मुखर्जी यांच्या आधी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयचे (एम) नेते बुद्धादेब भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा