29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेष...आणि 'विराट' निवृत्त झाला

…आणि ‘विराट’ निवृत्त झाला

Google News Follow

Related

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपताच राष्ट्रपती त्यांच्या भवनाकडे परतण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील राष्ट्रपतींसोबत होते. राष्ट्रपतींना भवनात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक येताच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंगरक्षकांच्या ताफ्यातील एका घोड्याला गोंजारले. त्यानंतर याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी गोंजारलेल्या या घोड्याचे नाव विराट आहे. विराट हा १९ वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त झाला आहे. गेल्या १३ वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान विराटकडे होता. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विराटचा विशेष सन्मान केला आहे. विराटच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्डही देण्यात आले आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली. गेल्या १३ वर्षांपासून विराट चार्जरच्या रुपात राष्ट्रपतींच्या आहेत. संचलन, बिटिंग द रिट्रीट, राष्ट्रपतींद्वारे केल्या जाणाऱ्या ओपनिंग अॅड्रेस ऑफ पार्लिमेंट आणि वेगवेगळ्या देशाच्या हेड ऑफ स्टेट्सच्या स्वागत समारंभात सहभागी झाला होता. विराटने यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांच्या ताफ्यातही सेवा बजावली आहे.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

राजपथावर पंतप्रधान मोदींच्या लूकची चर्चा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षा ताफ्यातील ‘विराट’ हा घोडा निवृत्त झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विराटची पाठ थोपटत त्याला निरोप दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा