25 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरदेश दुनियायुवराजच्या घरी आला आणखी एक 'युवराज'

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

Google News Follow

Related

भारताचा माजी क्रिकेटपटू फलंदाज युवराजसिंग आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री पत्नी हेजल किच हे आई बाबा झाले असून त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. भारताच्या माजी विश्वचषक विजेत्याने सोशल मीडियावर या बातमीची पुष्टी केली आहे.

युवराजने ट्विटरवर लिहले की, ” आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना, हे सांगताना आनंद होत आहे की, देवाच्या कृपेने आम्हला मुलगा झाला आहे. आम्ही या आशीर्वादासाठी देवाचे आभार मानतो. तसेच आम्ही  या आमच्या गोंडस बाळाचे जगात स्वागत करतो.”

युवराजच्या या पोस्टनंतर त्याच्यासह हेजलवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री नेहा धुपिया, रविना टंडन, बिपाशा बसू, टेनिसपटू सानिया मिर्झा तसेच माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, मुनाफ पटेल, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली यांच्यासह अनेकांनी युवराजच्या पोस्टवर प्रतिक्रिया करत युवी- हेजल या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

नोव्हेंबर २०१५ मध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला होता. आणि  नोव्हेंबर २०१६ त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह

युवराज सिंग हा माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे जो खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तो विशेषतः त्याच्या आक्रमक आणि मोहक स्ट्रोक खेळासाठी आणि भारतासाठी सामना जिंकणाऱ्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जात असे. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे जो मधल्या फळीत डाव्या हाताने फलंदाजी करायचा.

युवराजची पत्नी हेजल ही अभिनेत्री आहे. तिने जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमान खानच्या गाजलेल्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटामध्ये हेजलने एक भूमिका साकारली होती. बॉलिवूडसोबतच हेजलनं पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये देखील हेजलनं भाग घेतला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा