27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषश्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

श्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

Google News Follow

Related

नागपूरच्या एका विद्यार्थ्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीनभ अग्रवाल या नागपूरच्या विद्यार्थ्याने किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केल्यामुळे त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातील विविध राज्यांच्या मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोनाच्या महामारीमुळे यंदा हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला. त्यावेळी श्रीनभ अग्रवाल हा नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता.

केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोर वयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

हे ही वाचा:

जगात ठरली भारताची काकडी श्रेष्ठ…

कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’

शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…

श्रीनभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून त्याने दोन पुस्तके लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. ‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रम देखील श्रीनभने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणसंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील त्याच्या नावाची नोंद झाली आहे. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. श्रीनभ सध्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्रथम वर्षात (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा