पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रॅली आणि जाहीर सभांवर बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता ही बंदी आणखी ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची आणि ओमायक्रोन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो, साईकल आणि बाईक रॅली, सभांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. नंतर २२ जानेवारी आणि आता ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले आहे.
हे ही वाचा:
डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा
फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई
प्रजासत्ताक दिनी यासाठी वाजणार ‘सारे जहा से अच्छा’
बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले
निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच डिजिटल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब अशा पाच राज्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार असून सर्व प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करूनच निवडणूक प्रचार, मतदान आणि मतमोजणी असा सर्व निवडणूक कार्यक्रम पूर्ण केला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती.