मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रूग्णालयाजवळील कमला इमारतीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेसातच्या सुमारास कमला इमारतीला आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी या दुर्घटनेत आता सात जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी झाले आहेत.
कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही जखमी रुग्णांना भाटिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता अग्निशमन दलाने दिलेल्या आकडेवारीनुसार सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी झाले आहेत.
हे ही वाचा:
एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन
संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन
किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा
नायर रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला तर कस्तुरबा आणि भाटिया रुग्णालयात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्यावर संपूर्ण इमारतीची लाईट गेली. प्रत्येक मजल्यावर सहा घरे असून ज्या मजल्यावर आग लागली त्या मजल्यावर २० ते २२ जण राहत होते, अशी माहिती रहिवाशांनी दिली आहे.