28 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरदेश दुनिया'माझी शिफ्ट संपली'...ऐन प्रवासा दरम्यानच पाकिस्तानी वैमानिकाचा विमान चालवायला नकार

‘माझी शिफ्ट संपली’…ऐन प्रवासा दरम्यानच पाकिस्तानी वैमानिकाचा विमान चालवायला नकार

Google News Follow

Related

आपली कामाची शिफ्ट संपल्यावर त्याच्यापुढे काम करत राहणे कुणालाच मनापासून आवडत नाही. पण अनेकदा कर्मचाऱ्यांना मनाविरुद्ध ते करावे लागते. पण पाकिस्तानच्या एका पायलटने मात्र अशाप्रकारे काम करण्यास नकार दिला आणि तोही भर प्रवासाच्या दरम्यान!

पाकिस्तानच्या सरकारी एअरलाईन्सचे एक विमान सौदी अरेबिया मधील रियाद मधून इस्लामाबादसाठी निघाले होते. रविवारी या विमानाने आपले उड्डाण सुरु केले. पिके ९७५४ या विमानाने आपले उड्डाण सुरु केले खरे पण खराब हवामानामुळे त्यांना सौदी अरेबियातच आपत्तीकालीन लँडिंग करावे लागले. सौदी अरेबियामधील दम्मम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हे ही वाचा:

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांचं निधन

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

त्यानंतर हवामान योग्य झाल्यावर हे विमान पुन्हा इस्लामाबादसाठी उडणे अपेक्षित होते. पण त्यावेळी एक वेगळेच नाट्य पाहायला मिळाले. कारण या विमानाच्या पायलटने विमानाचे उड्डाण करायला नकार दिला. आपल्या कामाचे तास संपल्यामुळे यापुढे आपण विमानाचे उड्डाण करणार नाही असे पायलटकडून सांगण्यात आले.

पायलटच्या नकाराने सर्वच प्रवाशांना धक्का बसला. पण प्रवासीही अडून राहिले. जर पायलट विमान उड्डाण करणार नसेल तर आम्ही देखील विमानातून उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. ही सर्व परिस्थिती निवळून नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावरील सुरक्षारक्षकांना पाचारण करावे लागले. अखेर सर्व प्रवाशांची आसपासच्या हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था करण्यात आली.

पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती देताना असे सांगण्यात आले की “विमान चालकांसाठी प्रवासाच्या आधी योग्य प्रकारे विश्रांती घेणे आवश्यक असते त्यामुळेच असे करण्यात आले. तर त्या दिवशीच प्रवासी पाकिस्तानला पोहोचतील याची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा