भारतीय निवडणुकांच्या इतिहासात आजवर बोगस मतदानाची अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. पण आता ट्विटरवर घेण्यात आलेल्या पोलमध्येही बोगस मतदानातून पोल जिंकल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने हा नवा घोटाळा केला आहे.
नेमके काय घडले?
टाइम्स ऑफ इंडिया च्या पत्रकार रिचा पिंटो यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक एक पोल घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष सत्ता काबीज करेल असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यासोबत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चार पर्याय दिले होते.
नेटकऱ्यांनी वाटणाऱ्या पक्षाच्या नावावर क्लिक करून आपले मत नोंदवले. या संपूर्ण पोलमध्ये एकूण ७३ हजार ३९७ मते पडली. यापैकी ६०.६ टक्के मते काँग्रेसला पडली. भाजपाला २६.३ टक्के मते पडली. शिवसेनेला १२.४ टक्के मते मिळाली तर ०.६ टक्के लोकांनी एनसीपी ला कौल दिला.
हे ही वाचा:
किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री
‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’
‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’
गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या
या मतदानाची वेळ संपताना एकूण मतदान फक्त ३५ हजार २२३ इतके होते. ज्या मध्ये भारतीय जनता पार्टीला ४८ टक्के लोकांनी करून दिला होता. तर काँग्रेसला २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. पण अवघ्या काही सेकंदात तब्बल ३८ हजार पेक्षा जास्त मते काँग्रेस पक्षाच्या बाजूने पडली. त्यामुळे ते या मतदानात विजयी ठरले. अवघ्या काही सेकंदात एवढी मते काँग्रेस पक्षाला कशी मिळाली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. सोशल मीडिया एजन्सीजना हाताशी धरून काँग्रेसने हे बोगस मतदान घडवून आणल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावरून केला जात आहे.
Congress shows its Scammy DNA here too.
Till last momet it had 26% votes of 35k i.e. approx 9200 votes.
When final results came it became 61% of 75k votes i.e. approx 44.5K votes
35K votes added at last moment.
This is how Pappu Pinki will win 5 states, BMC and 2024 https://t.co/CFnlgtEwgv pic.twitter.com/iGi5hnaTCi
— Suresh Nakhua ( सुरेश नाखुआ )🇮🇳 (@SureshNakhua) January 17, 2022