महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी वरून फडणविसांनी हा पलटवार केला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाला लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारे संघटन म्हणायचे? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्हीडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा:
गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या
‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू
पंतप्रधान सुरक्षा दिरंगाईप्रकरणातील माजी न्या. इंदू मल्होत्रांना धमकी
‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’
यावरूनच नाना पटोले यांच्या विरोधात चौफेर टीका होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. “पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो..काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते?