काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
भंडारा जिल्ह्यातील रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्हीडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे.
यासंदर्भात आता पटोले यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असून ते नेहमीच मोदींवर अशी टीका करत असतात असे विरोधकांनी म्हटले आहे.
त्यावर पटोले म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात निवडणूक आहे. तिथे मी गेलो होतो पण ते विधान पंतप्रधानांबद्दलचे नाही. एका गुंडाबद्दल मी बोललो आहे. लोकांच्या त्या गावगुंडाबद्दल तक्रारी आहेत त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलत होतो. लोकांची गावगुंडाबद्दल तक्रार होती. त्यांना मी आश्वस्त करत होतो. मी असे वादग्रस्त बोलत नाही. पंतप्रधान मंत्र्यांचा उल्लेख केलेला नाही. मोदी नावाचा एक गावगुंड आहे. योगायोगाने त्याचे नाव मोदी आहे. वेळ आली तर मी त्याला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे मी लोकांना सांगितले.
हे ही वाचा:
संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर तो एन.डी. पाटील!
‘इच्छेविरुद्ध लसीकरण करण्यास भाग पाडता येणार नाही’
राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही
ब्रिटनमधील शीख धर्मियांनी का दिला मोदींना पाठिंबा?
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसला वैभवशाली परंपरा आहे. त्यांचे अनेक नेते वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे होऊन गेले. पण पटोलेंनी बालीशपणा मांडून ठेवला आहे प्रदेशाध्यक्षपदाचा. बालिश वक्तव्ये करणे ही त्यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अगदी राज्याचा मुख्यमंत्री असेल. पण आपण प्रमुख म्हणून त्याकडे पाहात असतो. पण याठिकाणी प्रत्येक गोष्ट तिरस्कारातून बघायची हे सुरू आहे.