भारतात सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची काल वर्षपूर्ती झाली. १६ जानेवारी २०२१ रोजी भारतात या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. वर्षभरातच भारताचा हा लसीकरण कार्यक्रम जगातील काही सर्वात यशस्वी लसीकरण कार्यक्रमांपैकी एक ठरला. या काळात भारताने अनेक विक्रम नोंदवले. पण या लसीकरण मोहिमेच्या यशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, वैज्ञानिकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. तर आयसीएमआर सारख्या संस्थेचे आणि भारत बायोटेक सारख्या कंपन्यांचे योगदानही मोठे आहे.
भारत बायोटेकने स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन ही लस निर्माण करून लसीकरणाच्या बाबत भारताला आत्मनिर्भर केले. म्हणूनच या लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त भारत सरकार मार्फत या मोहिमेचा विशेष गौरव करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पोस्ट खात्यातर्फे एक विशेष स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाचशे रुपये मूल्य असलेला हा स्टॅम्प रविवार १६ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या स्टॅम्पवर एक परिचारिका एका महिलेला कोविड प्रतिबंधक लस देत असतांनाचा फोटो आहे. तर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर आणि भारत बायोटाक या कंपनीचा देखील उल्लेख आहे.
हे ही वाचा:
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन
ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू
उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन
यासंबंधी भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी आपल्या ट्विटर खात्यावर असे म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करत आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी मिळून कोवॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस विकसित केली आहे. त्यावर पोस्टाचे हे तिकीट तयार करण्यात आले आहे. या निमित्ताने मी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.”
आज #1YearOfVaccineDrive के अवसर पर PM @NarendraModi जी के 'आत्मनिर्भर भारत' के सपने को साकार करते हुए, ICMR और भारत बायोटेक ने मिलकर जो स्वदेशी कोवैक्सीन विकसित की है, उस पर डाक टिकट जारी किया गया है।
मैं सभी वैज्ञानिकों को इस अवसर पर हार्दिक बधाई व धन्यवाद देता हूं। pic.twitter.com/3SKE2wvUqE
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 16, 2022