संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर एन.डी. पाटील हे होय. त्यांच्या सारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही. अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी.पाटील यांच्या निधनाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पाटील यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की, संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर एन.डी. पाटील हे होय. टोलच्या आंदोलनासारखा मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. एन.डी. पाटील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही. विरोधी पक्षात असूनही माझ्यावर त्यांच विशेष प्रेम होतं. टोलच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत आंदोलन केले होते.
शरद पवार यांनी ट्विट त्यांच्या निधनाबद्दल ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.
भाजपचे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये, ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची वार्ता समजली. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रा. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान आहे. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख राहिली आहे. असे ते म्हणाले.
एन डी पाटील हे मोठं व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या सारख व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही, अशा भावना खासदार छत्रपती संभाजी यांनी व्यक्त केल्या आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेले एन.डी.पाटील यामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
‘इच्छेविरुद्ध लसीकरण करण्यास भाग पाडता येणार नाही’
सौंदर्य स्पर्धेत भारतीय स्पर्धकाच्या ‘साप’नीतीला मिळाला सर्वोत्तम किताब
उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन
एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांची दखल घ्यावी लागायची. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला. असं राजू शेट्टी म्हणाले.
एन.डी. पाटील यांच्या रुपानं झुंजार नेता हरपल्याची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. वयाच्या ९० व्या वर्षीदेखील त्यांनी रस्त्यावर लढा उभारल्याचं ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्येही त्यांनी काम केल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.