भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता असून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आता नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता उच्च न्यालायाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळण्यात आली आहे. तर मनीष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत, निर्णयाला दोन आठवडे स्थगिती द्यावी, अशी मागणी नितेश राणेंच्या वकीलांनी कोर्टाकडे केली होती. नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकार २७ जानेवारीपर्यंत नितेश राणेंना अटक करणार नाही.
हे ही वाचा:
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन
ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू
मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. दरम्यान, न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी १४ जानेवारी रोजी नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले होते. सिंधुदुर्ग बॅंक निवडणुकीत विजय मिळवलेल्या सहकाऱ्यांसोबत नितेश राणे यांनी काहीकाळ चर्चा केली होती.