अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर लोकांवर अनेक प्रकारची बंधने लादण्यात आली आहेत. अफगाणिस्तानमध्ये संगीत ऐकणे हा एक ‘गुन्हा’ मानला जातो. तालिबान संगीताचा तिरस्कार करतात आणि त्यामुळे ते वेळोवेळी गायकांची वाद्ये तोडतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये तालिबान काही वाद्ये जाळताना दिसत आहेत.
अफगाणिस्तानच्या पख्तिया प्रांतातील जाझी आर्युब जिल्ह्यात तालिबानने काही वाद्ये पेटवल्याचा दावा व्हिडिओसह केला जात आहे. ट्विटर वापरकर्ता एहतेशाम अफगाणने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तालिबानने पख्तिया प्रांतातील झाझी रुबी जिल्ह्यात गायकांच्या वाद्ये पेटवून दिली. तालिबान इस्लाममध्ये दहशतवाद आणि हत्येला परवानगी आहे, परंतु जे द्वेष दूर करते, प्रेम वाढवते, मानवी जीवनात आनंद आणते, ते हराम आहे.
वाहनांमध्येही संगीत वाजविण्यास परवानगी नाही
तालिबानच्या राजवटीत वाहनांमध्ये संगीत ऐकण्याचीही परवानगी नाही. या कट्टरपंथी शासनाचा सर्वात मोठा बळी महिला आहेत. महिलांचे शिक्षण हक्क तालिबानने ताब्यात घेतले आहेत. महिलांना हिजाबशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस
सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!
किरण माने करायचा महिला सहकलाकारांसोबत गैर वर्तणूक
भारतीय लष्कराच्या लढाऊ गणवेशाची पहिली झलक
तालिबानच्या आदेशानुसार, चालक महिलेला तिचा पती किंवा इतर कोणत्याही संबंधित पुरुषाच्या उपस्थितीशिवाय त्यांच्या कारमध्ये बसवू शकत नाहीत. नमाजाच्या वेळी वाहनचालकांना गाड्या थांबवाव्या लागतात. गाडी चालवताना चालकाने मद्यधुंद अवस्थेत असू नये, असे सक्त आदेश आहे. तालिबानने गेल्या वर्षी काबूलवर ताबा मिळवला होता. त्यानंतर तालिबानने देशवासीयांसाठी नवे नियम केले आहेत. यामुळे अफगाणांनी प्रगती साधण्यासाठी गेल्या वीस वर्षात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.