भारत समजून घ्यायचा असेल तर भारताचे प्रत्येक राज्य अनुभवण्याची आवश्यकता असते कारण इथे प्रत्येक राज्याची वेगळी खासियत, संस्कृती आहे. भारत समजून घ्यायची इच्छा अनेकांना असते पण ते शक्य मात्र काही ठराविक लोकांनाच होते. भारत समजून घेण्यासाठी असाच एक तरुण निघालाय भारत परिक्रमा करायला आणि त्याच्या या प्रवासात येऊन पोहोचला ‘न्युज डंका’ च्या कार्यालयात! गौरव तिवारी असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या भारत भ्रमणाचे अनुभाव न्युज डंकाकडे उलगडले आहेत.
उत्तर प्रदेशातल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला तरुण शिक्षण पूर्ण करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी आपले आयुष्य समर्पित करून मेघालयात जातो आणि भारत समजून घेण्यासाठी भारत भ्रमण करण्याचे ठरवतो. म्हंटलं तर गौरव तिवारी यांची कथा एवढी साधी सरळ आहे. पण भारतभ्रमण करताना त्यांना आलेले अनुभव त्या कथेला रोचक बनवतात.
गौरव तिवारी यांच्या यात्रेमागचा नेमका हेतू काय? यात्रेत त्यांना भेटणारी माणसे कशी होती? या यात्रेच्या खर्चाची सोय ते कशी करतात? वेगवेगळ्या राज्यात येणारे अनुभव कसे होते? ही भारतयात्रा पूर्णत्वास गेल्यानंतर गौरव तिवारी काय करणार आहेत? अशा सर्व प्रश्नांवर गौरव तिवारींनी मोकळेपणाने भाष्य केले आहे.