भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी अनेक कुटुंबे विभागली गेली. काही पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले तर काही भारतात राहिले. असेच दोन भाऊ तब्बल ७४ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यांच्या या भावूक भेटीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद सिद्दीक आणि भारताचा हबीब उर्फ चिला हे तब्बल सात दशकांनंतर भेटले. पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडॉरमध्ये फाळणीदरम्यान वेगळे झालेले हे दोन भाऊ भेटले.
सिद्दीक हे सध्या पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे राहतात तर त्यांचा भाऊ भाऊ चिला उर्फ हबीब हे भारतातील पंजाबमध्ये राहतात. १९४७ मध्ये फाळणीपूर्वी दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. त्यानंतर ७४ वर्षांनंतर ते करतारपूर गुरुद्वारामध्ये भेटले. या भेटी दरम्यान ८० वर्षीय सिद्दीक आणि चिला हे भावूक झाले आणि एकमेकांना मिठी मारून रडले.
Brothers meet after 74 years because of 1947! #pakistan #punjab
(I admit, I cried) pic.twitter.com/NddUYBHK09
— Manpreet Singh (@mjassal) January 12, 2022
सिद्दीक यांनी यूट्यूब चॅनलद्वारे त्यांच्या भावाला भेटण्याची विनंती केली होती, त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी संपर्क साधून ही भेट घडवून आणली. चिला यांनी अजून लग्न केलेले नाही आणि त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता चिला यांनी सिद्दीकला सांगितली.
हे ही वाचा:
निळू फुले यांच्यावरील बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका कोण करणार?
महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय
…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!
राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट
या भेटीनंतर दोन्ही भावांनी करतारपूर कॉरिडॉर उघडल्याबद्दल आणि व्हिसा- मुक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत आणि पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. करतारपूर येथील गुरुद्वारा साहिबमध्ये या भावांच्या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर दोन्ही देशातील वापरकर्त्यांनी त्यांच्यावर भावनिक टिप्पण्या केल्या आणि कर्तापूर कॉरिडॉर उघडल्याबद्दल दोन्ही देशांच्या सरकारचे कौतुकही केले.