राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले असून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. या ऑनलाईन शिक्षणपद्धतीला कंटाळून एका विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दारूच्या दुकानाचा परवाना द्या अशी विचित्र मागणी केली आहे.
राज्यात सध्या शाळा, महाविद्यालये ही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र, याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा:
‘परमबीर सिंह यांचा स्वतःच्या पोलीस दलावर विश्वास नाही’ सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल
कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…
‘माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अनेक अडचणींना तोंड देऊन शिक्षण घेत आहे. मोबाईलला रिचार्ज करुनही इंटरनेट व्यवस्थित चालेल का याची शाश्वती नाही. शिक्षणासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असून फक्त ऑनलाईन शिक्षण मिळणार असेल तर माझा काहीही फायदा होणार नाही. खासगीकरणाचे शिक्षण मला परवडणार नाही. घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा महामारीत दारुची दुकाने सुरु आणि शिक्षण बंद असेल तर मी शिक्षण घेऊन काय करु? देशी दारूच्या दुकानाचा परवाना देऊन मला सहकार्य करा,’ अशी व्यथा या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात मांडली आहे.