पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील काशी विश्वनाथ धाम हा भव्य दिव्य प्रकल्प काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा देशभर चांगलाच गाजला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम साठी अहोरात्र काम करणाऱ्या कामगारांसोबत भोजन घेतले. तर त्यांचा सत्कारही केला. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष भेटवस्तू पाठवली आहे
ही विशेष भेट म्हणजे पादत्राणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कर्मचाऱ्यांसाठी १०० चपलांचे जोड पाठवले आहेत. त्याही खास ज्यूट पासून बनवलेल्या. ही विशेष भेट वस्तू पाठवण्या मागचे कारणही तितकेच खास आहे.
हे ही वाचा:
चोरीनंतर चोराने व्यक्त केला अनोख्या पद्धतीने पश्चात्ताप!
सदावर्तेंना हटवून पेंडसेंची नियुक्ती; संप मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन
मुख्यमंत्री महोदय अजून किती जणांचे आवाज दाबणार?
दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचे पत्र मिळाले तब्बल ७६ वर्षांनी
हिंदू धर्मामध्ये मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने चपला किंवा बूट हे मंदिरा बाहेर काढले जातात. मंदिरात वावरताना चप्पल, बूट घातले जात नाहीत. यामागचे एक महत्त्वाचे कारण रबर अथवा चामडे हे मंदिरात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे हे कर्मचारी मंदिरात बिना चपलांचे काम करतात. मंदिरातील कर्मचाऱ्यांची ही स्थिती पंतप्रधान मोदींच्या कानावर पडली.
तेव्हा त्यांनी यावर एक खास असा तोडगा शोधला. त्यांनी ज्यूट पासून बनवलेले १०० चपलांचे जोड हे या कर्मचाऱ्यांसाठी पाठवले आहेत. आता हे कर्मचारी हेच पादत्राणे वापरून मंदिरात काम करू शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकार मधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
EC Model code of conduct in poll bound states.
— Banarasiya🇮🇳 (@purebhartiya) January 10, 2022